तुमचं स्वागत आहे -माझा कोर्स एप्लिकेशन हे Learnmorepro चे E -learning प्लॅटफॉर्म आहे. "संगणक शिक्षण आपल्या मायबोली भाषेतुन सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देणे" हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. तुमचे संगणक कौशल्य आणखी वाढवण्याचा हा एक परिपूर्ण मार्ग असू शकतो. या अनुप्रयोगाद्वारे आपण घरूनच ऑनलाइन व्यावसायिक संगणक अभ्यासक्रम करू शकता. जसे डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing), ग्राफिक डिझायनिंग (Graphic Designing), वेब डिझायनिंग (Web Designing), एम-एस ऑफिस (MS Office), व्हिडीओ एडिटिंग (Video Editing), डिजिटल अकाउंट(, Digital Account), टॅली प्राइम (Tally Prime), ब्लॉगिंग (Blogging), फोटोशॉप (Photoshop) इत्यादी सर्व काही मराठी मध्ये आहे.या एप्लिकेशनचे संस्थापक आहेत :- सतीश ढवळे यांना संगणक शिक्षण क्षेत्रात १५ वर्षांचा अनुभव आहे.ते ५ वर्षांपासून त्यांच्या ब्लॉग (www.learnmorepro.com) आणि Youtube चॅनेल (Learn More) द्वारे संगणक शिक्षणाला प्रोत्साहन देत आहेत. सध्या त्यांचे ६ यूट्यूब चॅनेल्स आहेत, त्यामधील Learn More या चॅनेल चे १ दशलक्ष सदस्य पूर्ण झाले आहेत. त्यांना ६ सिल्व्हर प्ले अवॉर्ड्स आणि १ गोल्डन प्ले अवॉर्ड YouTube द्वारे प्रदान केले गेले आहेत.